अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी

अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरे नुसार घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. त्या सर्वजणांना  चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वाना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपादभटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभट।नी चौकशी केली  तेव्हा महिला म्हणाली, 'आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती.पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला. त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा' तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटाना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासींनीस  आग्रह केला पण ती म्हणाली' तुम्ही  पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते.' श्रीपाद भटांनी सर्व सेवेकर्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशाप्रकारे स्वामी समार्थानीच  सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य (श्रीपाद भट यांचे सारखे एकनिष्ठ सेवक) ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले


अक्कलकोटास राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी रहात असत. तेथे येणाऱ्या एका गुराख्याच्या पोराला तुझ्या गावात येऊ का? असे स्वामी विचारीत. दोन दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही. तिसरे दिवशी तो या म्हणाला तसे स्वामी गावात गेले. याप्रमाणे अक्कलकोटात श्रीगुरूंची ओळख प्रथम गुराख्याच्या मुलाशी झाली. अक्कलकोटास आल्यानंतरचेच स्वामींचे चरित्र उपलब्ध आहे. त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही. एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्य भक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी असता वसंतऋतूतील एका मध्यरात्री आंगणात पहुडलेले होते. तेव्हा स्वामींना गाण्याची लहर लागली. व “गोरे रूप तुझें तुजला पाहिलें सात ताल माडीवर ॥” ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली, ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले, “महाराज, आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते. आपली जात कोण, आईबाप कोण?” स्वामींनी चटकन् उत्तर केले की, “आमची जात चांभार, आई महारीण व बाप महार आहे.” असे म्हणून महाराज पोट धरधरून मोठ्याने हसू लागले.


क्कलकोटास एक म्हातारी सोनारीण वेडसर दिसे. पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे. एकदा तिच्या देखत महाराजांस एका कलापाने प्रश्न विचारला, “स्वामीनु आपण कोण आहा?” त्यावेळी श्रीसमर्थ म्हणाले ‘मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर.’ हे ऐकून ती म्हातारी म्हणाली- “वटपत्र शयनी मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत.” नंतर कोणी एक कर्वे यांनी विचारले, “हे महाराजांचे सत्यार्थरूपवचन आहे काय? परंतु आपली ज्ञाती कोण?” समर्थ म्हणाले- “आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र, आमची मीन राशी; पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस! पण काय रे, तुझी फक्कड मुलगी पुण्यास रात्रंदिवस फिरते तिची ज्ञानी कोण?” हे ऐकून प्रश्न विचारणारा गृहस्थ ढेकळासारखा विरघळला! 


बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की, आपण स्वामींची इतकी सेवा केली, तरी महाराज अजून का प्रसन्न होत्त नाहीत? अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही? ह्याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दु:खे असतात. दु:ख-संकटे एकामागून-एक येतच राहिली, तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दु:खे का? इतके नामस्मरण केले, तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधी-कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात, पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांचीही इच्छा हीच असते की, आपण प्रारब्धभोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे. आपले स्वामी तर इतके कनवालू-दयाळू आहेत की, ते दु:खातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात. जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही हेच स्वामी विद्यारण्यांच्या दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. दु:ख-संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते.